करमाळासोलापूर जिल्हा

आईच्या निधनाचे दुःखावर मात करून कु. तृप्ती शिंदे हिने डीफार्म परिक्षेत मिळवले उत्तुंग यश

करमाळा प्रतिनिधी

आईच्या निधनाचे दुःखावर‌ मात करून कु. तृप्ती राजेंद्र शिंदे रा.बुरुडगाव‌ जि अहमदनगर हिने डी .फार्मसी परिक्षेत 79% गुण मिळवुन उत्तुंग यश मिळवले आहे. तृप्तीची आई सौ शोभा राजेंद्र शिंदे हिचे गेल्यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले अशा परिस्थितीमध्ये तृप्ती हिने‌ दुःखाला बाजुला सारून आपल्या आईची इच्छा पुर्ण केली आहे.

आईची इच्छा होती की मी शिकुन स्वतःच्या पायावर उभे रहावे तिची आशिर्वाद हिच प्रेरणा घेऊनच आपण अभ्यास केला. एकत्र कुटुंब असल्यामुळे आजोबा वसंतराव शिंदे आजी पार्वती शिंदे वडील राजेंद्र शिंदे काका अंकुश शिंदे दिलीप शिंदे सुभाष शिंदे, आईची माया देणाऱ्या काकु वैशाली कविता कावेरी आत्या पुष्पा मामा धीरज खैरे बहिण पुजा आरती यांचे प्रोत्साहन मार्गदर्शन याचा आशिर्वाद मिळाल्यामुळे आपण यश मिळवल्याचे तिने सांगितले.

कु. तृप्ती शिंदे पत्रकार दिनेश मडके यांची भाची आहे. लहानवयात मातृछत्र हरपलेल्या प्रतिकुल परिस्थितीत दुःखावर मात करुन तृप्ती शिंदे हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करुन कौतुक होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE