पश्चिम भागातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार- सरपंच महेंद्र पानसरे
करमाळा समाचार – संजय साखरे
संपूर्ण राज्यातील कोरोना ची वाढती गंभीर परिस्थिती पाहता कोरोनाग्रस्त रुग्णांना लवकर उपचार मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोना ने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला असून दिवसेंदिवस याची तीव्रता वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोर्टी व जिंती प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होण्यासाठी कुंभारगाव चे लोकनियुक्त सरपंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सदस्य व प्रख्यात भजन गायक श्री महेंद्र तानाजी पानसरे यांनी महत्वाची भुमीका पार पाडली लवकरच बेड मिळणार असल्याची माहीती पानसरे यांनी दिली.

करमाळ्याचे आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून कोर्टी व जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरच ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोर्टी व जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोर्टी, सावडी, राजुरी, कुंभारगाव, भिलारवाडी, खातगाव, टाकळी ,कात्रज,घरतवाडी, दिवे गव्हाण,भिलरवाडी, हिंगणी,केत्तुर, पारेवाडी या गावांचा समावेश होतो.

या लोकांना उपचारासाठी पुणे, बारामती, इंदापूर या ठिकाणी जावे लागत होते. यामुळे या रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार असून यांना आता कोर्टी व जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कुंभार गावचे सरपंच श्री महेंद्र पानसरे यांनी केलेल्या या कार्याचे पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.