पै. गणेश भाऊ सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा
करमाळा समाचार
पै. गणेश भाऊ सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा

सावंत गटाचे समाजकारणाची आवड असणारे पैलवान गणेश भाऊ सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून पार पडला. यावेळी बोलताना गणेश भाऊ सावंत म्हणाले की, माझा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता मी श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर विद्यालय मध्ये व पांडे येथील मातोश्री वृद्धाश्रम अन्नदान व स्नेहभोजन देऊन हा वाढदिवस साजरा करत आहे व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यानिमित्त साधून दरवर्षी माझ्या हातून गोरगरिबांची दिन दुबळ्यांची सेवा घडो …असे म्हणाले व तसेच आमचे बंधू एडवोकेट राहुल भाऊ सावंत सुनील बापू सावंत संजय अण्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावलावर पाऊल टाकून सामाजिक बांधिलकी जपत आलेलो आहे असेही सावंत म्हणाले. यावेळी सरपंच हनुमंत रोकडे इंदापूरची युवा उद्योजक दिपक भाऊ व्यवहारे बापू उबाळे याचे आदी.. भाषणे झाले…
या वाढदिवसानिमित्ताने श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर विद्यालय मध्ये स्नेहभोजन देण्यात आले व तसेच पांडे येथील मातोश्री वृद्ध आश्रम येथे वृद्धांना जेवण देण्यात आले व तसेच कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय ग्राउंड येथे 100 झाडांचे रोपांची लागवड करण्यात आली आहे.

यावेळी कर्मवीर अण्णासाहेब साहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने 100 झाडांची लागवड केल्याबद्दल गणेश भाऊ सावंत यांचेअभिनंदन व पुष्पहार देऊन सत्कार केला…
यावेळी दीपक मुसळे बापू उबाळे आकाश जाधव, काशिनाथ जाधव सुकुमार उबळे आकाश जाधव शंभूराजे सावंत युवराज शिंदे गोट्या कोंगे पियूष सावंत शुभम चांदगुडे रवी सुरवसे आदी. जणांनी परिश्रम घेतले