E-Paperक्राईम

कर्जत तालुक्यात किराणा दुकानात चोरट्यांचा डल्ला ; तीन लाखांची चोरी

करमाळा समाचार 

किराणा दुकान बंद झाल्यानंतर दुकानात शटर उचकटुन प्रवेश करीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करुन चोरी करण्यात आली आहे. यामध्ये चैतन्य देविदास सायकर, (वय 27) धंदा किराणा दुकान रा. सावतामाळी वस्ती, राशीन ता. कर्जत, जि. अहमदनगर यांच्या दुकानातुन तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

राशीन ते भांबोरा जाणारे रोडलगत सावतामाळी वस्ती येथे सावतामाळी किराण अँड बेकर्स नावाचे सायकर यांचे किराणा दुकाण आहे. दि. 21/12/2020 रोजी रात्री 11/30 वा. दुकाण बंद करुन कुलुप लावले व घरी गेले.  त्यानंतर आज दि. 22/12/2020 रोजी बाजार दिवस असल्याने चैतन्य सायकर व चुलत भाऊ निळकंठ सायकर असे दोघे सकाळी 07/00 वा. चे सुमा. दुकाणी आलो तर आम्हाला दुकाणाचे शटरच्या मध्यभागी दोन ते अडीच फुट उचकटलेले दिसले म्हणुन आम्ही पाहीले असता दुकाणातील सामानाची पण उचकापाचक झालेली दिसली. सी.सी.टी.व्ही कमेरे फोडलेले दिसले त्यावर खात्री झाली की, दुकाणाची चोरी झालेली आहे.

या चोरीत दुकाणातुन रोख रक्कम व किराणा माल चोरीस गेला होता. 22,000/- रु. किं. चे 15 जमीनी तेलाचे पत्र्याचे डबे प्रत्येकी डब्यात 15 किलो तेल असलेले नवीन किं. अंदाजे, 85,000/- रु. किं. चे सिगारेटचे बक्स त्यामध्ये ब्रिस्टल, गोल्ड फल्क, लाईट किंग, क्लासीक, आईस बस्ट, इबल बस्ट चे बक्स नवीन किं. अंदाजे, 20,000/- रु. किं.चे काजु, बदामचे पकिंग मांडणीत ठेवलेले सुमारे 30 किलो वजनाचे किं. अं., 30,000/- रु. किं. चे परीवार टाटा चहाचे बक्स सुमारे 60 ते 65 किलो वजणाचे किं. अं., 20,000/- रु. किं. चे संतुर साबन, व्हील साबन, कोलगेट, पन्ड्स पावडरचे बक्स किं. अं., 75,000/- रु. किं. चे त्यात सुहाना, अंबारी पुड्यांचे बक्स किं. अंदाजे., 6000/- रु. किं. चे अँक्टीव्ह फिक्सल कं. चे सीसीटीव्ही कमे-याचे डी.व्ही. आर. जु. वा. किं. अं., 40,000/ रु. रोख त्यात 10,5,2 रु. दराची नाणी,  8,000/- रु. रोख त्यात 50,20,10 रु. दराच्या नोटा असे एकुण 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE