जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्लँपचा काही भाग कोसळला
प्रतिनिधी – करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या वाशिंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लँपला तडे गेले असुन सीलिंग चा काहीभाग कोसळला आहे. लॉकडाऊन व मुलांना सुट्यांचा काळ असल्याने शाळा बंद होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही ही हानी झाली नाही.

परंतू कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रभाव कमी होताच शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे उर्वरित स्लँपचा तडे गेलेला भाग कोसळून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने आदर्श शाळा उपक्रमात राज्यातील ३०० शाळांमध्ये वाशिंबे जिल्हा परिषद शाळेची निवड केली आहे.जर शाळेची ईमारत व्यवस्थित नसेल तर आदर्श शाळा होणार कशी असा संतप्त सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाकडे धोकादायक ईमारतीची माहिती दिली आहे. परंतु अध्यापर्यंत शिक्षण विभागाने कसलीही दखल घेतली नाही. तरी शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेत ईमारतीची तात्काळ दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करावा
-सतिश पवार
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती. वाशिंबे.नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्ती साठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. निधी ऊपलब्ध होताच ईमारतीची तात्काळ दुरुस्ती केली जाईल.
राजाराम भोंग.
गटशिक्षणाधिकारी, करमाळा, पंचायत समिती.