करमाळासोलापूर जिल्हा

जिल्हा परिषदेची पुर्वतयारी सुरु करमाळ्यात सहा गट तर बारा गणांचे नियोजन !

करमाळा समाचार

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 ची प्रभाग रचना व पूर्वतयारी सुरू असतानाच त्या नुकतेच पंचायत समिती व जिल्हा परिषद तालुकानिहाय सदस्य संख्या विचारात घेण्यात येत आहे. सदरची सर्व पूर्वतयारी सुरू असून अद्याप काही जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. लवकरच आरक्षण तसेच गट व गण जाहीर करण्यात येतील.

जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम 1962 मधील नियम 2 मधील तरतुदीनुसार करण्यात येत असून जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्‍चितीसाठी पूर्वीच्या जनगणनेचे आकडे व तात्पुरती किंवा अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली लोकसंख्या म्हणजे 2011 च्या जनगणने विचारांनी घेतली आहे.

आरक्षण व सोडतीच्या कार्यवाही साठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्ती पुर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. सदर प्रभाग रचना तयार करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत सांगण्यात आले आहे.

सध्या पूर्वतयारी करीत असताना यामध्ये करमाळा पंचायत समितीसाठी 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व वाढीव लोकसंख्या लक्षात घेता तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सध्या करमाळा तालुक्यात केम, वांगी, वीट, पांडे व कोर्टी असे पाच गट असून यामध्ये एक गट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पांडे या गटाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर पंचायत समिती गणांमध्ये केम, वांगी, पांडे, जिंती, साडे, जिंती, चिखलठाण, कुंभेज , कोर्टी, रावगाव असे 10 गण असून यामध्ये वाढ होऊन बाराजण होण्याची शक्यता आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE