करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पाठक सरांचा सल्ला आणि बियाणे विक्रेता आणि कंपनीला चार लाखांचा दंड ; ग्राहक मंच कारवाई

करमाळा समाचार


तूर बियाणे सदोष निघाल्यामुळे शेतक-याचे नुकसान झाल्याने संबंधित बियाणे विक्रेता व बियाणे कंपनी ने शेतक-यास तीन लाख नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश सोलापूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष भारती सोळवंडे व सदस्य श्रध्दा बहिरट यांनी दिला आहे. यामुळे अखेर न्याय मिळाला आहे असल्याची भावना शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

करमाळा येथील रहिवासी कांतीलाल उत्तमचंद बलदोटा व संतोष बलदोटा यांची अंजनडोह ता. करमाळा येथे शेत जमीन गट नं.६३/६ क्षेत्र २ हेक्टर ५५ आर असुन त्यांनी १६ जूलै २०२१ रोजी त्यांच्या शेतात मशागत करुन करमाळा येथील बियाणे विक्रेते गोविंददास गोपाळदास देवी बियाणे दुकानातून निमकर सीडस या कंपनीची काळी तूर ३५ पिशव्या बियाणे विकत घेऊन २५ पिशव्या बियाणाची जमिनीत पेरणी केली होती.

परंतू ते बियाणे सदोष निघाल्यामुळे उगवण झाली परंतु उत्पादन निघाले नाही. यासाठी मशागत, पेरणी, मंजूर आदीवर खूप खर्च झाला होता. कष्ट करून उत्पादन न मिळाल्यामुळे त्यांनी बियाणे दुकानदार, सीडस कंपनी, शेती अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली त्याचा वारंवार पाठपुरावा केला परंतु तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्राहक पंचायतचे तत्कालीन जिल्हास्तरीय सदस्य स्व. भालचंद्र पाठक यांच्या सल्ल्याने सोलापूर ग्राहक तक्रार निवारण आयोगात दि. २७/०२/२०२३ रोजी तक्रार दाखल केली होती.

ads

सोलापूर ग्राहक तक्रार निवारण आयोगा समोर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाले शेवटी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने निमकर सीडस प्रा.लि, फलटण जि. सातारा व बियाणे विक्रेता गोविंदास गोपाळदास देवी फर्म, मेन रोड करमाळा. यांना दोषी ठरवत त्यांच्यावर तीन लाख नव्वद हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदारास ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE