करमाळा

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी ; मल्लास उपसभापती सरडे यांनी एक महिन्याचे दिले मानधन

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा पंचायत समितीचे उपसभापती सभापती दत्तात्रय सरडे यांच्या हस्ते पैलवान गौतम सुरेश शिंदे यांचा सत्कार करमाळा पंचायत समिती येथे करण्यात आला. यावेळी माजी सभापती शेखरजी गाडे, जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे , गौडरे येथील हानफुडे सर उपस्थित होते.

यावेळी दत्तात्रय सरडे बोलताना म्हणाले, माझे मित्र पैलवान सुरेश शिंदे यांनी वडील म्हणुन मुलाला चांगले संस्कार लावले आणी हालाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत अथक आणि प्रमाणिक संघर्ष केला. तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते असे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती पै.दत्तात्रय सरडे यांनी पोथरे येथील पैलवान गौतम शिंदे यांच्या सत्कारानिमित्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

गौतम शिंदे यांनी नुकत्याच वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत मानाची चांदीची गदा मिळवली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या म्हणजेच कुस्तीच्या खेळात अधिक प्रगती करता यावी म्हणून मराठी शाळेत शिकत कुस्तीचे धडे लहानपणापासून गिरवले. वडिलांच्या मिरवणुकीत घोडे पुरवण्याच्या व्यवसायात मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या रकमेत कशीबशी गुजराण करत गौतम यांनी शालेय स्तरापासूनच विविध वजनी गटात प्रावीण्य मिळवत यशाची कमान चढती ठेवली आहे.

त्यांच्या याच यशाची दखल घेत मा.आ.नारायण आबा पाटील यांच्याच मल्ल विद्येला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा पाठपुरावा करत उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी आपले एक महिन्याचे मानधन गौतम शिंदे यांना देऊ केले आहे. शिवाय आज मल्लविद्या जी केवळ गरिबांच्या मुलांच्याच आधाराने तग धरून आहे तिला राजाश्रय मिळत अगदी हौशी आणि सधन लोकांनी पण उचलून धरले तर कुस्तीचा सुवर्णभूतकाळ नव्यानं उजळल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले व भविष्यात कोणत्याही मदतीसाठी तत्पर असल्याचे भरीव आश्वासन दिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE