गोरगरीबांसाठी कोविड केअर सेंटर उभारलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पितृशोक
करमाळा समाचार
कोरोना काळात गोर गरीब लोकांसाठी १०० खाटांचे कोविड सेंटर उभा केलेल्या करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या वडिलांचे अहमदनगर येथे उपचार घेत असताना निधन झाले आहे. मागील काही दिवसापूर्वी वारे यांनी कोवीड सेंटर येथे सुरू केले होते.

तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचे वडील गोरख वारे यांच्यासह संतोष व त्यांचे भाऊ संदिप यांनाही कोरोनाची बाधा पूर्वीच झाली होती. त्यातून सामान्य लक्षणे नंतर संतोष वारे व संदिप वारे हे सुखरूप बरे झाले. पण गोरख पवार यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते.

वडील आणि भाऊ आजारी असतानाही संतोष वारे यांनी करमाळा तालुक्यातील पोथरे येथे गोर गरीब लोकांसाठी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटरची स्थापना केली व त्याठिकाणी उपचार मिळावेत त्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच बरोबर वडील व भावाची काळजी घेत होते भाऊ संदिप वारे काही दिवसांपूर्वी बरे झाले होते. पण गोरख वारे यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.