फोटो तुमचे लक्ष विचलीत करु शकतात – उजनीत आढळले बेवारस मृत शरीर
प्रतिनिधी | करमाळा

तालुक्यातील चिखलठाण हद्दीत उजनी जलाशयाच्या परिसरात एक २८ ते ३० वर्षीय पुरुष जातीचे मृत शरीर आढळून आले आहे. सदरची व्यक्ती पाण्यात वाहत आल्याबाबत पोलिसांचा संशय आहे. त्याची ओळख पटत नसल्यामुळे संबंधित वर्णनाचे कोणी आढळल्यास करमाळा पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये २४ सप्टेंबर २२ रोजी दुपारी तीन च्या पूर्वी एक अनोळखी २८ ते ३० वर्षीय पुरुषाचे मृत शरीर आढळून आले होते. त्याला परिसरातील लोकांनी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी तो पाण्यात बुडून मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्या अंगावर पिवळा फिकट रंगाचा फुलाची डिझाईन असलेला पूर्ण बाहीचा शर्ट आहे. या वर्णनाच्या व्यक्ती कुठे हरवली असल्यास किंवा ओळखीची असल्यास करमाळा पोलीस ठाणे फोन क्रमांक ०२१८२- २२०३३३ व ९४२३०९३०३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री जगताप यांनी केले आहे.