करमाळासोलापूर जिल्हा

जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण ही काळाची गरज कृषिकन्या अश्विनी वाघमोडे

प्रतिनिधी – दिलीप दंगाणे


जिंती येथे जनावरांचे लसीकरण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागृतता आणि कृषी वैद्यकीय कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विषय शिक्षक प्रा. चैताली डोंगरे पाटील, प्रा. डॉक्टर सचिन फुगे, प्रा. प्रज्ञा कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अश्विनी सदाशिव वाघमोडे तिने करमाळा तालुक्यातील मौजे जिंती येथे जनावरांच्या लसीकरण याचे शिबिर आयोजित केली होती.

सदर शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यकीय डॉक्टर निळकंठ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी संसर्गजन्य आजार यावर प्रतिबंध करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जनावरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो हे लक्षात घेऊन आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सध्याच्या काळात लसीकरण करणे गरजेचे आहे हे शेतकऱ्यांना यावेळी पटवून देण्यात आले. या शिबिरात अंतर्गत पशुवैद्यकीय डॉक्टर कदम यांनी जनावरांची पाहाणी करून आधी संसर्गजन्य आजारांसाठी गाईला लसीकरण केले. यावेळी श्री सदाशिव वाघमोडे पांडुरंग कदम इत्यादी उपस्थित होते. सदरचे शिबिराचे नियोजन कोरोना संसर्गाचा नियम पाळून करण्यात आली होती.

शेतीसोबतच पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पशुधनाचा वाढता विस्तार पाहता लसीकरण व इतर पशू आरोग्य व्यवस्था शासनाकडून वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. लसीकरण संपूर्ण होणे हे जनावरातील साथीचे आजार नष्ट करण्यासाठी गरजेचे आहे. तसेच सर्व शेतकऱ्या मध्ये त्याबद्दल जनजागृती करणे सुद्धा गरजेचे आहे.
श्री निलकंठ कदम
पशुधन पर्यवेक्षक

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE