लहानग्यांच्या जीवाशी खेळ ? ; पोषण आहाराच्या डाळीत वाळु
समाचार टीम –
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शालेय पोषण आहारातील महत्त्वाचा घटक असलेली डाळी मध्ये 20/25% वाळू आढळून आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता. व ईतर गावात विचारना केली असता तिथे ही हाच प्रकार आहे असे समजले. व येथील जातेगाव येथील डाळीचे नमुने घेऊन. पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जो स्वतः च्या लोभासाठी म्हणजे डाळीचे वजन वाढवण्यासाठी लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. तो जर असाच चालू राहीला. तर विद्यार्थ्यांना जर काही धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण. असा सवाल ग्रामस्थ व पालक करीत आहेत. तरी संपूर्ण तालुक्यातील शाळेमध्ये हाच प्रकार आहे या सर्व प्रकाराची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

तसेच वाळू मिश्रीत डाळ विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देऊ नये असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका यांच्या वतीने देण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जि उपाध्यक्ष भाऊ झोळ, जि कार्य उपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, शाखाअध्यक्ष जातेगाव अशोक लवंगारे उपस्थित होते . राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे देखील हा प्रकार समजताच निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले होते.