करमाळासोलापूर जिल्हा

तीन शक्तीपीठा पैकी एक असलेली कमलाभवानी माता ; नवरात्र उत्सवाची तयारी

करमाळा समाचार

तालुक्यातील आराध्य दैवत असलेले श्री देवीचा माळ येथील तीन शक्तीपीठापैकी एक शक्ती पीठ उभा राहिलेला आहे. ९६ कुळीचा उद्धार करणाऱ्या करमाळा तालुक्यातील आई कमला भवानी मातेचा नवरात्र उत्सवाचा गजर धुमधडाक्यात साजरा होणार आहे. तब्बल तीन वर्ष कोरोनामुळे उत्सव साजरा केला नव्हता पण आता भक्तांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

उत्सवाचे नियोजन श्रीदेवीचा मळा ग्रामपंचायत कमला भवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येतो. हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो. आई कमला भवानी करमाळा व महाराष्ट्रातील भाविक भक्तांना नवसाला पावणारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावागावातून वाडी वस्तीवरून भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी उपस्थिती असते. या उत्सवाला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात. नवरात्रीच्या काळात करमाळा शहर तालुक्यातील भाविक भक्तांसाठी मुस्लिम बांधव मांसाहारी दुकाने पूर्ण नऊ दिवस बंद ठेवून सहकार्य करतात. तर नऊ दिवस अनवानी नवरात्रीचे उपवासाची परंपरा आहे.

यानिमित्ताने श्रीदेवीचा माळ येथील जगदंबा देवी अन्नछत्र मंडळ श्रीदेवीचा माळ यांच्यावतीने भाविकांना मोफत उपवासाचे पदार्थ वाटप करतात. श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत च्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आले आहेत. नवरात्री काळात पाणी, दिवाबत्ती प्रश्न ग्रामपंचायतच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत असल्याचे माहीती सरपंच महेश सोरटे यांनी दिली. मंदिरावर वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच वेगवेगळ्या खेळाचे व खाद्याची तयारी ९६ पायरी परिसरात करण्यात आली आहे. तर भक्ताच्या सेवेत ग्रामपंचायत तयार असुन उत्सवाची शोभा वाढवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच महेश सोरटे व उपसरपंच दिपक थोरबोले यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE