करमाळासोलापूर जिल्हा

whatsapp गृप ॲडमीनचे अधिकार वाढवले ; आता गृपची कमान ॲडमीनकडे संपुर्ण फायदे वाचा

समाचार टीम –

अनेकदा आपण व्हाट्सअप आणि व्हाट्सअप मधील ग्रुप वापरत असताना चित्रविचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. एखाद्याने पाठवलेला मेसेज आपल्या ग्रुपमध्ये नकोसा असतो पण तरीही आपल्याला तो पहावा लागतो किंवा संबंधित व्यक्तीला त्याबाबत कल्पना देऊन तो मेसेज हटवण्याबाबत सांगावे लागत होते. पण आता एडमिन च्या कार्यक्षेत्रात ग्रुपचा सबंध कारभार आल्याचे दिसून येत आहे.

ग्रुप ॲडमिन पहिल्याप्रमाणे साधारण संस्थापक राहिलेला नसून आता त्याच्याकडे संपूर्ण ग्रुपची धुरा आल्याचे दिसून येत आहे. आपल्या ग्रुपमध्ये एखादा चुकीचा मेसेज किंवा एडमिनला अपेक्षित नसलेला मेसेज ग्रुप मध्ये आल्यानंतर तो मेसेज संबंधित व्यक्तीच्या परस्पर हटवण्याचे अधिकार आता व्हाट्सअप ने ग्रुप ॲडमिनला दिले आहेत. यामुळे बऱ्याच अडचणी दूर होण्याचे शक्यता आहे. तर पूर्वी ग्रुप मध्ये येणाऱ्या मेसेजेस ला एडमिनला जबाबदार धरले जात होते. पण आता एडमिन असे मेसेज हटवू शकतो. त्यामुळे अधिकृतपणे आता ग्रुप ॲडमिनच संबंधित ग्रुपचा जबाबदार व्यक्ती बनला आहे.

मागील बऱ्याच काळापासून ग्रुप मध्ये धार्मिक, कौटुंबिक बदनामी, हिंसक व विविध प्रकारच्या मेसेज येण्याचे प्रमाण वाढले होते. यामधून काही जणांच्या धार्मिक भावना दुखवल्या जात होत्या, तर नेतेमंडळींवर होणारे आरोप प्रत्यारोपामुळे ग्रुप वर वाद होत होते. मागील काही काळात तर खून होण्यापर्यंत या मेसेजमुळे मजल गेली होती. परंतु या दोघांत होणारा वाद हा एडमिन पर्यंत येत नव्हता किंवा एडमिन त्याला दुरुस्त करू शकत नव्हता. पण आता ही सुविधा व्हाट्सअपने ऍडमिनला दिल्यामुळे केवळ एकच ऍडमिन नाही तर जेवढे ऍडमिन आहेत ते पुढील एडमिन चा मेसेजही डिलीट करू शकतात एवढी मुभा देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पूर्वी वैयक्तिक पाठवलेला मेसेज हा तोच व्यक्ती डिलीट करू शकत होता. त्याला एक तासाभराचा कालावधी तिला दिला होता. पण आता ऍडमिन मेसेज डिलीट करण्यासाठी कोणत्याही कालावधी दिलेला नाही. त्यामुळे मागील दिवसभरातील मेसेज केव्हाही डिलीट करू शकतो. त्यामुळे जरी एखादा सदस्य चुकून मेसेज डिलीट करण्याचं राहून गेला तर ऍडमिन ते कार्य करू शकतो.

यापूर्वी केवळ सदस्य स्वतः टाकलेला मेसेज तासाभरात डिलीट करू शकत होता. पण यातही अनेक जण चुका करत होते. काही जणांच्या नकळत घरातील व्हिडिओ किंवा फोटो ग्रुप वर येत होते आणि त्या घाई गडबडीत तो डिलीट फॉर एव्हरीवन करण्यापेक्षा डीलीट फॉर मी केल्याने पुन्हा तो मेसेज कोणालाच डिलीट करता येत नव्हता. पण आता ही संधी ऍडमिनला मिळत असल्याने ज्याने चुकून मेसेज टाकलाय आणि तो डिलीट करता येत नसेल तो मेसेजही एडमिन डिलीट करू शकतो . त्यामुळे ही सुविधा एक प्रकारे उत्कृष्ट अशी सुविधा मानली जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE