करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रवासी महिलेची बॅग घेऊन पळालेल्या जवळ्याच्या महिलेला पोलिसांनी पकडले ; लाखांचा मुद्देमाल ताब्यात

करमाळा समाचार

दि. १९ रोजी पहाटे ०५/३० वा. च सुमारास फिर्यादी तृप्ती किरण जाधव वय २८ वर्षे धंदा घरकाम, रा अनाळा ता पंराडा जि धाराशिव सध्या रा साईनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे गावी जाणेसाठी पुणे ते अनाळा ता पंराडा जि धाराशिव येथे जाणेसाठी डायरेक्ट बस न मिळाल्याने ते स्वारगेट ते करमाळा बसने ते करमाळा बस स्टॅन्ड येथे सकाळी १० वाचे सुमारास बस मधुन उतरले व त्यांनी अनाळा येथे जाणेसाठी बस ची चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनाळा ता पंराड़ा जि धाराशिव येथे जाणे करीता दुपारी १२/०० वा ता बस आहे.

फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा व फिर्यादीची भाची करमाळा स्टॅन्डवर बसची वाट पाहत बसले होते. दुपारी १२ वा ता बस असल्याने फिर्यादी फिर्यादीचा मुलगा व फिर्यादीची भाची असे सोबत आणलेले सामान फिर्यादीचे दोन्ही हातात बॅग व फिर्यादी यांची भाची यांचे एका हातात एक बॅग व दुस-या हातात गुलाबी रंगाची हॅन्डपर्स देवुन ते परांडा ते अजंठानगर जाणारी बस प्लॅटफॉर्म वर आल्याने सदची बस ही अनाळा ता. पंराडा येथे जाणार असल्याचे वाटल्याने ते सर्वजण बस च्या दरवाजा जवळ उभे होते व बसमधुन महिला, पुरूष खाली उतरत होती. त्यामुळे चडणारे व उतरणारे लोकांची खुप गर्दी झाली होती.

त्यावेळी फिर्यादी यांनी सदर बस कंडक्टर यांस फिर्यादीयांनी विचारले कि बस अनाळा येथे जाते का असे विचारले असता सदर बस हि अनाळा येथे जात नाही असे सांगितले व फिर्यादी व सोबचे लोक हे सर्व सामाईन घेवुन गर्दीतुन बाजुला येवुन उभारले असता फिर्यादी यांची भाची चे हातातील गुलाबी रंगाची हॅन्डपर्स ही तिचेकडे नसल्याचे तिने सांगितले व सदर बस मधे चडुन व आजुबाजूला शोधुन हि गुलाबी रंगाची हॅन्डपर्स मिळून आली नाही सदर गुलाबी रंगाची हॅन्डपर्स मध्ये १)१,००,०००/- रू किंमतीचे सोन्याचे मनिमंगळसुत्र त्यामध्ये सोन्याच्या वाटया व २४ नग सोन्याचे मनी व काळे मनी असे व २) ३५००/- रूपये रोख रक्कम त्यात ५००,२००,१००,५०,२० रूपये भारतीय चलनी नोटा असे एकुण १,०३,५००/- करमाळा बस स्टॅन्ड येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घवुन त्यांच्या गुलाबी रंगाची हॅन्डपर्स हातातील घेवुन चोरी केली. त्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. ८५९/२०२५, भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण येथे करमाळा बस स्टॅन्डवर दिवाळीसणाच्या सुट्टट्टया असल्याने बसस्टॅन्ड वरचोरीचा गुन्हा घडला असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस (भा.पो.से.), यांनी करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण व बस स्टॅन्डवरील सी.सी.टी.व्ही चे अवलोकनाच्या अधारे सदरचा गुन्हा हा महिला आरोपी नामे सुमन सोपान पिटेकर वय ४० वर्षे रा नानज जवळा ता जामखेड जि अहिल्यानगर हिने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक खाना झाले असता गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदर गुन्हयातील आरोपी हे चोरी करून बसने गेले आहेत.

अशी माहीती मिळाल्याने आरोपीचा माग घेत पोलीस पथक रवाना झाले होते. गुन्हातील गेलामाल व आरोपीचा शोध घेतला असता महिला आरोपी नामे सुमन सोपान पिटेकर वय ४० वर्षे रा नानज जवळा ता जामखेड जि अहिल्यानगर हि मिळून आली सदर महिलेचा करमाळा गुन्हे प्रकटीकरण मधील महिला अंमलदार यांनी सदर महिला आरोपीची अंगझडती घेतली असता तिचे जवळ गुन्हयतील गुलाबी रंगाची हॅन्डपर्स व त्यामध्ये १)१,००,०००/- रू किंमतीचे सोन्याचे मनिमंगळसुत्र त्यामध्ये सोन्याच्या वाटया व २४ नग सोन्याचे मनी व काळे मनी असे व २) ३५००/- रूपये रोख रक्कम त्यात ५००, २००, १००,५०,२० रूपये भारतीय चलनी नोटा असे एकुण १,०३,५००/-गेला माल मिळुन आला व सदर महिला आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केला असल्याने सदर गुन्हयात महिला आरोपी नामे सुमन सोपान पिटेकर वय ४० वर्षे रा नानज जवळा ता जामखेड जि अहिल्यानगर हिस अटक केली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE