महाराष्ट्रानंतर बिहार मध्ये राजकीय भुकंप ; jdu आणी bjp झाले वेगळे
समाचार टीम –
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून मंत्रिमंडळ विस्तार होतो ना तोच एक मोठी राजकीय भूकंप देशाच्या राजकारणात घडताना दिसून येत आहे. बिहार येथील राजकारणात हा भूकंप झाल्याचे दिसून येते. नितीश कुमार यांनी भाजप सोबत असलेली युती तोडण्याचा निर्णय घेतला असून ते आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. यामागे मागील अनेक दिवसांची दिसपूस असल्याचे बोलले जात आहे.

बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्या पक्षाकडे कमी संख्याबळ असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत नितेश कुमार यांचे संबंध पाहिजे तितके चांगले नव्हते. त्यामुळे सारखी धुसफूस होण्याचे घटना घडत असताना त्यांना केंद्रातून पाठबळ असल्याचे नितेश कुमार यांचा समज झाला होता. त्यातूनही ही धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

बिहारमध्ये जे डी यु व बीजेपी चे युती तुटल्यात जवळजवळ निश्चित झाले आहे. आता त्या ठिकाणी इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले जाऊ शकते. बहुमतासाठी 122 हा आकडा पाहिजे असून जेडीयु 45 , आरजेडी 79, काँग्रेस 19 व लेफ्ट 16 असे एकूण 159 चा संख्या बळ हे jdu सोबत असणार आहे.
सध्या नितेश कुमार हे राज्यपाल यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत तेजस्वी यादव हेही जाऊ शकतात अशा चर्चा आहे. लवकरच नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजिनामा देऊ शकतात. तर तिथेही महाविकास आघाडीसारखे सरकार उदयास येऊ शकते. जेडीयु पक्षालाही वाटत होते की भाजपा आपला पक्ष संपवू पाहत आहे. यातूनच मागील विधानसभेपासूनच सदर चर्चा होते. आज अखेर त्याला तोंड फुटले व नितेश कुमार यांना बीजेपी सोबत काडीमोड करण्याचा निर्णय घेतला.
एक प्रकारे नितीश कुमार यांच्या केंद्राच्या राजकारणातील हा प्रवेशाचा दरवाजा तर नाही ना अशाही जोरदार चर्चा सुरू आहे. आता बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर आणले जाऊ शकते अशी चर्चा आता जोर धरू लागले आहे असे झाल्यास बीजेपीला एक तगडे आव्हान कुमार हे उभा करू शकतात असे दिसून येत आहे.