पूजा झोळे यांच्या वतीने सामाजिक कृतज्ञता म्हणून दिव्यांगासाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न
करमाळा समाचार
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या 30 जून रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस कु. पुजा झोळे यांच्या वतीने सामाजिक कृतज्ञता म्हणून दिव्यांगासाठी मोफत व्हील चेअर ,सायकल,स्टिक्स, कर्चेस वाटपाचा कार्यक्रम आ. संजय मामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे आज संपन्न झाला .

कार्यक्रमाच्या प्रारंभी करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणाताई पवार,नगर परिषदेचे अधिकारी अश्विनी पाटील, जिल्हा परिषद सदस्या राणी वारे यांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला.
पूजा टकले,शिवम पवार ,सोहम माने, बकुळा जगदाळे, उर्मिला शिंदे, सनी जगताप, अस्मा कुरेशी ,शरद शिंदे, विकास गोडगे, जोयफ शेख यांना या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाली की, दिव्यांग व्यक्तींसाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे कार्य खूप मोठे असून त्याच कार्याचा वारसा कु.पूजा झोळे यांनी चालवलेला असून त्यांच्या या कार्यक्रमाला भविष्यातही निश्चित सहकार्य राहील.
महिला प्रतिनिधी म्हणून पूजा झोळे यांनी अतिशय कमी वयामध्ये सामाजिक भान जपत दिव्यांगासाठी साहित्याचे वाटप केलेले आहे आहे त्याबद्दल त्यांचे गौरव करण्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा भावना करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी वीनाताई पवार यांनी व्यक्त केल्या.
यावेळी विना पवार यांच्या यांच्यातर्फे कु.पूजा झोळे व आमदार संजयमामा शिंदे यांना कमलाभवानी च्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे,नलिनीताई जाधव, शितल शिरसागर ,राजश्री कांबळे, स्नेहल अवचर, चंद्रहास निमगिरे, शरद नेटके, अभिषेक आव्हाड समाधान शिंगटे, सचिन नलावडे, अश्पाक जमादार, सर्वेश देवकर, मानसिंग खंडागळे, रामभाऊ नलवडे,काका सरडे ,संग्राम ढवळे,सत्यम सूर्यवंशी,भारत जगदाळे, नंदू पाटील आदी उपस्थित होते.