करमाळासोलापूर जिल्हा

उद्यापासून सुरु होणारे कुकडी कालव्याचे आवर्तन तात्पुरते स्थगित

प्रतिनिधी – करमाळा 

संग्रहीत चित्र

कुकडी कालवा मंडळांतर्गत लाभक्षेत्रात येणाऱ्या पारनेर, श्रीगोंदा ,कर्जत आणि करमाळा या तालुक्यांसाठी 3. 50 टीएमसी पाण्याचे 28 दिवसाचे आवर्तन दिनांक 9 मे 2021 पासून सुरू होणार होते. त्याचा प्रोग्राम जाहीर झालेला होता, परंतु सदर आवर्तन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या 9 एप्रिल 2021 च्या बैठकीमध्ये उन्हाळी आवर्तन याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आलेला होता. या बैठकीतील निर्णयाविरुद्ध श्री प्रशांत आवटी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असल्यामुळे मा. उच्च न्यायालयाने दिनांक 9 मे 2021 पासून सुरू करण्यात येणाऱ्या उन्हाळी आवर्तनाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत हे आवर्तन स्थगित राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन कुकडी कालवा सिंचन मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE