करमाळासोलापूर जिल्हा

पुण्याच्या तिघांचा जेऊर परिसरात ओढ्यात सापडला कारसह मृतदेह ; दुर्घटना तीसऱ्या दिवशी उघडकीस

करमाळा समाचार


बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये जेऊर लव्हे मार्गावर वाहत्या पाण्यात वाहून गेलेली स्विफ्ट कार आज शुक्रवारी ओढ्यामध्ये मिळून आली. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हे तिघेही ही पुणे परिसरातील आहेत. राहुल नवनाथ टोनपे वय २७वर्ष मूळ गाव झरे ता.करमाळा सध्या राहणार काळेवाडी पिंपरी चिंचवड, पुणे tगजानन सदाशिव वायकर वय ७२ वर्ष मुळगाव वडशिवणे ता.करमाळा सध्या पिंपरी चिंचवड, पुणे, सचिन गजानन वयकर वय ३८ वर्षे मुळगाव वडशिवणे सध्या पिंपरी चिंचवड, पुणे. अशी त्या तिघांची नावे आहेत.

बुधवारी पुण्याहुन आपल्या मुळ गावी पाहुण्यांना भेटण्यासाठी एक स्विफ्ट प्रवासी कार (क्रमांक एम एच १४ एफ सी ३९७०) घेऊन पिता पुत्र कारचालकासोबत करमाळ्याला आले होते. ते सुरुवातीला कंदरला आले होते. नंतर निंभोरे येथे जात असताना हा अपघात झाला.

एका दुचाकी चालकाला याबाबत संशय आला होता. त्यामुळे त्याने यापूर्वी पोलिसांना कळवले होते. त्यानुसार मागील दोन दिवस पोलिस त्या ओढ्यामध्ये शोध घेत होते. पण त्यांच्या हाती काही लागत नव्हते. आज पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी कारसह तिघांचे मृत शरीर आढळून आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE