करमाळा नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे महावीर उद्यानाची दुरावस्था ; मोठ्याप्रमाणावर गवत वाढल्याने साप विंचवाचा धोका
करमाळा टीम –
कोरोना काळात तब्बल दोन वर्ष बंद असलेले करमाळ्याचे सर्वात मोठे उद्यान आज नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. रविवार सारखा सुट्टीचा दिवस लहान मुले व मोठ्या माणसांना विरंगुळ्यासाठी असलेले हे ठिकाण आज गवत, झाडी, झुडपे वाढल्यामुळे खराब झाले आहे. तर आत मध्ये लक्ष ठेवण्यासाठी एक कुटुंब राहत असुनही जनावरांचा मुक्त वावर आहे. तर पाण्यात वाढलेले डास पण वाढल्याने डेंगु सारख्या आजाराचा धोका आहे.

महावीर उद्यान हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे असे उद्यान आहे. करमाळा जेऊर रस्त्याला या उद्यानामध्ये शहरातील सर्व लहान मुले कुटुंबीय हे माज्जा करण्यासाठी येतात. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. झाडांची निगा राखली जात नाही. या ठिकाणी असलेल्या खेळण्याची ही दुरावस्था होत चालली आहे.

लहान मुले या परिसरात खेळत असताना साप, विंचू अशा जीवघेण्या प्राण्यांचा वावर या ठिकाणी असू शकतो. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना ही होऊ शकते. त्यामुळे नगर परिषदेने वेळीच जागे होऊन योग्य पावले उचलणे गरजेचे आहेत. सदर बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत खेळणीही आहेत परंतु फक्त दुर्लक्ष असल्यामुळे याची दुरावस्था झाली आहे.
सर्व परिसर अतिशय खराब झाल्याने या भागात पालक आपल्या मुलांना घेऊन येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आलेले पालक गेटवरूनच माघारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग एवढा मोठा खर्च करून अशा प्रकारची बाग उभारले आहे. त्याचा उपयोग काय असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे.
सध्या नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. मागील नगरसेवकांचा कार्यकाल हा पूर्ण झाल्याने प्रांत अधिकारी यांच्याकडे नगरपरिषदेचा ताबा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या नगर परिषदेचे काम सुरू असून योग्य रीतीने काम होत नसल्याचे दिसून येत आहे. आज केवळ आम्ही बागेत होत असलेली दुरावस्था समोर मांडली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शहराची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्याचेही चित्र आणि दोन दिवसात आपल्यासमोर स्पष्ट करू.