श्री अदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यासंदर्भात जेष्ठ नेते पवारांचा सकारात्मक प्रतिसाद ; मुंबईत बैठक
करमाळा समाचार
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी आज मुबंई येथे श्री आदिनाथ सहकारी साखर व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नियोजनासाठी आणि कारखानाने व्यवस्थित सुरु करण्यासाठी आज मुबंई येथे स्पेशल बैठक घेतली.
पवार साहेब यांनी यावेळी दोन्ही सहकारी साखर कारखाने चालू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब, सहकार आयुक्त शेखर गायकवाड साहेब, तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय भैय्या बागल, बाजार समितीचे संचालक सुभाष आबा गुळवे, मकाईचे एमडी हरिशचंद्र खाटमोडे उपस्थित होते. दोन्ही कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे यावर्षी चालण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. यातून आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत अशी माहीती देण्यात आली.