वाशिंबेतील पोस्टमन पवार यांचा स्तुत्य उपक्रम ; शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याने होतेय कौतुक
वाशिंबे प्रतिनिधी
सुकन्या समृद्धी योजना व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना १० वर्षांच्या आतील मुलां मुलींसाठीसाठी राबवली जाते. या योजनेबाबत गावातील सर्व स्तरातील नागरीकांना जास्तीत जास्त लाभ पोहचवण्यासाठी वाशिंबे गावचे कर्तव्यदक्ष पोस्टमन सुभाष पवार हे प्रयत्न करीत आहेत.

पवार यांनी आज वाशिंबे पोस्ट कार्यालय अंतर्गत गावातील शेत शिवारातील सालकरी गडी, मजूरी करणार्या महीला यांना कामावर असलेल्या ठिकाणी थेट भेट घेत शेताच्या बांधावर जाऊन पालकांना योजनेची माहिती दिली व आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, ऊज्वल भविष्यासाठी योजना किती फायदेशीर आहे.
सर्वांना याची माहिती पटताच अनेक मजूर दांपत्यांनी शेताच्या बांधावरच सुकन्या सम्रृद्धि योजनेअंतर्गत आपल्या पाल्यांची खाती ऊघडली. अनेक मजूरांना कामाच्या वेळेमूळे व ईतर कारनांमूळे पोस्ट कार्यालयापर्यंत जाता येत नाही.

परंतु पवार यांनी बांधावर जाऊन सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहीती देऊन बांधावरच खाती ऊघडन्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्याने अनेकांना योजनेत सहभागी होता आले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.