करमाळासामाजिकसोलापूर जिल्हा

कुलगुरुंच्या उपस्थितीत शुक्रवारी करमाळ्यात दोन मोठे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार ; वायसीएम येथे आयोजन

करमाळा समाचार

कोविड १९ जागृती व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा शैक्षणिक सामंजस्य करार अंतर्गत प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा (y.c.m. karmala), भारत महाविद्यालय, जेऊर (bharat college jeur) व विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभुर्णी (viththalrao shinde college tembhurni) यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ जागृती सामूहिक कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शुक्रवारी (दि २९) सकाळी साडे आकरा वाजता करण्यात आले आहे.

या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस (mrulalini fadanvis) उपस्थित असणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे तर सदर कार्यशाळेस रिसोर्स पर्सन व प्रमुख वक्ते डॉक्टर बाबासाहेब तांदळे (dr. Balasaheb tandale), शास्त्रज्ञ आय. सी. एम. आर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजी, पुणे असणार आहेत. दुसरे रिसोर्स पर्सन माननीय शैलेश पवार(shailesh pawar), शास्त्रज्ञ आय. सी. एम. आर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजी, मुंबई असणार आहेत.

सदर कार्यशाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात शुक्रवार दि२९ रोजी सकाळी ११ :३० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यशाळेस चारही महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. अतुल लकडे काम पाहणार आहेत. तरी सदरच्या कार्यशाळेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE