अतिक्रमीत पानंद रस्त्याचा प्रश्न प्रहार ने सोडविला
प्रतिनिधी – संजय साखरे
पंढरपूर तालुक्यातील उंबरे(पागे)गावामधील उंबरे-वाघोली पानंद रस्ता खुला करण्यासाठी गेल्या वीस वर्षापासुन शेतकरी दगडु शंकर हुबाले हे पुढारी व प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी जात होते परंतू त्यांची याबद्दल प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती.

म्हनुन याबाबत प्रहार चे पंढरपुर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे आणी बापु मोहीते यांनी राज्यमंत्री बच्युभाऊ कडु यांची भेट घेऊन उंबरे गावातील काही मुद्दे तसेच पानंद रस्त्याचा विषय निदर्शनास आणुन दीला.यानंतर बच्युभाऊ नी तातडीने दखल घेत हे सर्व मुद्दे निकाली काढण्यासाठी 9-7-2021 ला तहशिलदार यांना लेखी आदेश काढले.
परंतू याबाबत प्रशासनाकडुन अजुनपर्यत चालढकल करण्याचा प्रयत्न होत होता. म्हणुन सोलापूर जिल्हा प्रहारचे डँशिंग शहरअध्यक्ष अजीत भाऊ कुलकर्णी आणि जिल्हाअध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्यासमवेत प्रहार टीमने तहसीलदार यांना चांगलेच धारेवर धरत प्रहार स्टाईल ने समजवण्याचा ईशारा दिल्यानंतर अखेर उंबरे-वाघोली अनेक वर्षापासुन अतिक्रमन झालेला रस्ता खुला करण्याचे काम सर्कल भाऊसाहेब यांच्या उपस्थिती त तातडीने चालू करण्यात आले आणी दगडु शंकर हुबाले ह्या शेतकर्याला न्याय मिळाला.

यावेळी सरपंच महादेव शिंदे, ग्रा सदस्य बापुसाहेब कानगुडे, ग्रा सदस्य विलासतात्या सलगर प्रहारचे अध्यक्ष नानासाहेब इंगळे,बापूसाहेब मोहीते, शहाजी सलगर, लोंढे गुरुजी, सागर हुबाले, मारुती कदम उपस्थित होते.