पंढरपूरच्या वकीलास मारहाण करमाळ्यात निषेध
करमाळा समाचार
पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथे वकिलासह सहा जणांवर जीवघेणा हल्ला केला असून अवैध वाळू चोरीच्या तक्रारी केल्यामुळे वाळू माफियांनी सदरचा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असुन याबाबत करमाळा येथे माहिती मिळताच करमाळा तालुका बार असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसभराच्या कामापासुन अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंढरपूर येथे काल झालेल्या घटनेत संबंधित वकिलावर झालेला हल्ला हा जीवघेणा होता यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची जखम झालेले फोटो व्हायरल झाल्यानंतर सदरचा प्रकार हा करमाळा येथील वकील संघटनेच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी यासंबंधी बैठक घेतली व ज्येष्ठ मंडळी तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड. राम नीळ, उपाध्यक्ष ॲड. आलिम पठाण, सचिव ॲड. विनोद चौधरी यांच्यासह जेष्ठ व वकील मंडळी उपस्थित होते.
