करमाळासोलापूर जिल्हा

आंदोलन इशारे, विनवण्या तरीही कारवाई नाही अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

प्रतिनिधी | करमाळा


नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील साफसफाई स्वच्छता करणारा ठेकेदार विनित पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप ३ नाशीक यांच्या विरोधात चौकशी करण्याकामी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या कड़े लेखी निवेदनाव्दारे अर्ज दिला होता. त्यानंतर तीन वेळा स्मरण पत्रे दिली. परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाकडुन कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे दि ७ जुन रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहीती तक्रारकर्ते फारुक जमादार यांनी दिली.

सदर ठेकेदाराने नगरपालिकेस साफसफाई स्वच्छताची बिले आवक रजिस्टर मध्ये न नोंदवता आरोग्य निरीक्षक यांच्या कड़े बीले जमा केली आहे. ठेकेदाराने १२ सप्टेंबर पासुन पंधरा दिवस कोणतीही पुर्व सुचना न देता काम बंद ठेवले होते. त्यावर नगरपालिका ने कोणतीही दंडात्मक कार्यवाही केलेली नाही. माजी नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुर येथुन ६० सफाई कामगारानी येऊन शहर स्वच्छ केले त्याचेही बील ठेकेदाराला देण्यात आले.

सदर ठेक्यामध्ये करमाळा नगरपरिषदेचे अंदाजे ५० स्वच्छता कर्मचारी काम करतात त्याची बिलेही ठेकेदाराला देण्यात येते. ठेकेदाराच्या करारपत्रात नियम क्रमांक ३९ नुसार स्वच्छता साफ सफाई ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे काम बंद ठेवता येत नाही. सदर ठेकेदाराने दोन वेळा काम बंद ठेवले होते. परंतु मुख्याधिकारी यांनी ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कार्यवाही केलेली नाही. तसेच कायद्याने एखाद्या व्यक्ति ने तक्रार नोंदविल्या नंतर सात दिवसात माहीती देणे बंधनकारक असताना सुध्दा माहीती सहा महिन्यानी दिली.

politics

त्यामुळे संबंधित अधिकारी वर अधिनियम २०१३ अंतर्गत शिस्तभंगाची व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हा प्रशासन नगरपालिका विभाग सोलापुर जिल्हा पोलीस प्रमुख सोलापुर ग्रामीण करमाळा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE