E-Paperकरमाळाक्रिडाताज्या घडामोडीपंढरपूरबार्शीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विद्यापीठ सामन्यात पंढरपूर, बार्शी व सोलापूर विजयी ; पंढरपूरच्या एकाचे शतक

प्रतिनिधी | करमाळा

पु.अ. होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत टी २० सामन्यांच्या अखेरच्या दिवशी के. बी. पाटील कॉलेज पंढरपूर, बीपी सुलाखे कॉलेज बार्शी व त्यानंतर द्यानंद कॉलेज, सोलापूर यांनी विजय नोंदवला आहे. तर दि ४ पासून चाळीस षटकांचे सामने करमाळ्यातील दोन्ही मैदानावर खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये आता सर्व तुल्यबळ संघ उर्वरित राहिले आहेत. आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत साहिल कोताळकर यांनी पंढरपूर संघाकडून खेळताना शतक झळकावले. तर बार्शी संघाच्या ओंकार लोहारने चमकदार कामगिरी करत सहा बळी मिळवले.

आजच्या सामन्यांचे विश्लेषण-
केबी पाटील कॉलेज पंढरपुर विरुद्ध सिंहगड सोलापूर पहिला सामना झाला यामध्ये पंढरपूर संघाने नाणेफेक जिंकली क प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला यावेळी साहिल कोताळकर याने ५७ बॉल मध्ये १०८ धावा करीत शतक झळकावले व ज्ञानेश्वर गवरे यानेही ५० चेंडुत ७८ धावा केल्या या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पंढरपूर संघाने वीस षटकात २३५ धावा जमवल्या यात धावांचा पाठलाग करताना सिंहगड संघाला केवळ ६१ धावात मजल मारता आली पंढरपूर संघ तब्बल १७४ धावांनी विजयी झाला आहे. यामध्ये साहित कोताळकर सामनावीर ठरवण्यात आले.

दुसरा सामना बीपी सुलाखे कॉलेज बार्शी विरूध्द डी एच बी सोनी कॉलेज सोलापूर यांच्यात रंगतदार सामना झाला यामध्ये सोनी कॉलेज ने नाणेफेक जिंकुन क्षेत्ररक्षण घेतले पण त्यात ते अपयशी ठरले. बार्शी संघातील महेश चोरमले याने २१ चेंडुत ४४ तर ओंकार लोहार याने २१ चेंडुत २७ रण केल्या विरोधी संघाकडुन अनिरुद्ध स्वामी ५७(२५ चेंडु) याचे शतक व्यर्थ गेले यात सुलाखे संघाने ७६ धावांनी विजय मिळवला. यामध्ये सोनी संघाला विजयासाठी २०२ धावा करायच्या होत्या. षटकांचा वेग कमी ठेवल्याने तीन षटक कपात करण्यात आले त्यामुळे केवळ १७ षटकात लक्ष गाठणे कठीण झाले. यासामन्यात ओंकार लोहार ने अष्टपैलू कामगिरी केली यात फलंदाजीसह ४ षटकात १२ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत.

तसेच तिसरा सामना जीन मैदान येथे झाला याही सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनशीचा टप्पा पार केला यामध्ये बी एम आय टी बेलाटी व द्यानंद यांच्यात सामना झाला. नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. यासामध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना द्यानंद ने २०० धावा केल्या. यावेळी सुदर्शन कांबळे३३(३३) व शुभम चव्हाण ४५(२९) धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना यशराज पाटील ५६(६६) धावांची एकाकी झुंज अपयशी ठरली. यासामन्यात दयानंद कॉलेज कडुन अभिषेक धुम्मा ३, विशाल सुतार २ व शुभम नवडे २ विकेट घेतल्या. यामुळे बेलाटी संघ ४७ धावांनी पराभुत झाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE