आक्रोश मोर्चासाठी निघालेल्या आंदोलनकर्त्याना रस्त्यातच अडवले ; आंदोलनकर्ते ठाम
करमाळा समाचार
मराठा आक्रोश मोर्चा साठी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या गाड्यांना अडवण्यासाठी रस्त्यांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला होता. त्या दरम्यान मोर्चेकरी पोहोचल्यानंतर पुढे जाऊन न दिल्याने त्यांनी टेंभुर्णी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे वातावरण थोडेसे चिघळल्याचे दिसून येत आहे. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला असून पोलिस प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर येथे मोर्चेकरी पोहचू नये कोरोनाच्या नियमामुळे त्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढू शकतो अशा सूचना पोलिसांच्या वतीने देण्यात आलेल्या असताना आक्रोश मोर्चा साठी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज सोलापूरच्या दिशेने निघालेला असताना मध्येच आडवत त्यांना माघारी पाठवण्याचे काम पोलिस करत आहेत. पण यातुनही अनेक जण पुढे जात आहेत. तर काही त्याच ठिकाणी ठिय्या मांडत आहेत.