आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर करमाळ्यात काळ्या फिती लाऊन निषेध ; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन शिक्षकांचा इशारा
करमाळा समाचार
जुनी पेन्शन मागणीसाठी लोकशाही मार्गाने पेन्शन मार्च काढणाऱ्या जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलकांना अटक करून गुन्हे दाखल केल्यामुळे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करमाळा येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तर गुन्हे मागे घेऊन तात्काळ जुनी पेन्शन लागू करण्याबाबत मागणी केली आहे.

सदरचे निवेदन शिक्षकांच्या वतीने करमाळा येथे तहसीलदार यांना देण्यात आले. दिनांक २१ रोजी पडघा कल्याण येथे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने लोकशाही सनदशीर मार्गाने पेन्शन मार्च काढण्यात आला होता. याआंदोलकांची बाजू ऐकून न घेता सरकारने २४ डिसेंबर रोजी जकात नाका येथे पेन्शन मार्च काढून रात्रभर आंदोलकांना अंधारात व असुरक्षित वातावरण स्थानबद्ध केले.

तर पेन्शन मार्च रोखण्याचा प्रयत्न केला आणि ठाणे येथे नवघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट असल्याचे सदरच्या निवेदनात नमूद केले आहे. तरी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत आंदोलकांवर गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चंद्रहास चोरमले, भारत पांडव, आदिनाथ देवकते, निशांत खारगे, नवनाथ ससाने, आबा तोरमल, वसंत बदर, साईनाथ देवकर, विनोद वारे, अरुण चौगुले, तात्यासाहेब जाधव, अजित कणसे, बाळासाहेब मोरे, हनुमंत सरडे, सोमनाथ अनारसे आदी उपस्थित होते.