केशव प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
करमाळा समाचार
करमाळा शहरातील केशव प्रतिष्ठानच्या साल 2022च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करमाळा तालुक्याचे पोलिस निरिक्षक सूर्यकांत कोकणे व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या दिनदर्शिकेमध्ये करमाळा शहरातील नामांकित हॉस्पिटलच्या सुविधा व फोन नंबर अत्यावश्यक सुविधा व रुग्णवाहिकेचे नंबर देण्यात आले असुन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला या दिनदर्शिकेचा उपयोग होणार असल्याचे मत पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केले.

तसेच केशव प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक कार्य करत आहे आपण नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य ती मदत करु असे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश भाऊ करे पाटीलयांनी व्यक्त केले.
यावेळी केशव प्रतिष्ठान चे अध्यक्ष जगदीश आगरवाल, उपाध्यक्ष रवीराज पठाडे, सचिव पंकज सोळंकी,डॉ अमोल घाडगे, खजिनदार मिलिंद माने, सचिन आबा कणसे, गणेश सातपुते, अँड प्रियाल आगरवाल, प्रवीण चोपडे,राजाभाऊ फंड, दिनेश पंडित,नवनाथ क्षिरसागर, अजित जागते, बबलू भिसे, विशाल बनकर आदी प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.