करमाळासोलापूर जिल्हा

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थीनीचा आपल्या गावी उपक्रम

प्रतिनिधी- करमाळा समाचार

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील कृषी कन्या शुभांगी सहदेव बेडकुते यंदा स्वतः च्या गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबवत आहेत. वरकुटे ता. करमाळा येथील कृषी कन्या बेडकुते शुभांगी सहदेव यांनी आपल्या गावामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. करोना काळात निरोगी वातावरण, स्वच्छ हवा किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पटवून दिले.

गावात जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यांचे महत्त्व सांगितले व गावचे सरपंच पै. श्री दादा साहेब सीताराम भांडवलकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. वृक्षारोपणासाठी अनेक गावकर्यांची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने गावचे उपसरपंच गुलाब मस्के, माजी उपसरपंच बाळासाहेब बेडकुते व तानाजी बेडकुते, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ गात, सहदेव बेडकुते, सुशील कुमार हांडे यांची होती.

कृषी कन्या शुभांगी सहदेव बेडकुते यांनी गावात अनेक प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखवली आहेत. यांच्या या कार्याचे गावकर्यांनी व गावचे सरपंच पै. श्री दादा साहेब भांडवलकर यांनी कौतुक केले. कृषी कन्या यांनी बोलताना सांगितले की त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फुगे सर, प्रा. शिंदे सर व प्रा. कुदळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE