नुतन पोलिस उपनिरीक्षक माधुरी बिनवडे-खाडे यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सन्मान
करमाळा प्रतिनिधी (दि.18)
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते परंतु योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश वेळा त्यांची संधी चुकते असे मत नूतन पोलीस उपनिरीक्षक माधुरी हरिचंद्र बिनवडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विक्रमी गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक ( एन.टी – ड) मधून संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करमाळा येथे राष्ट्रीय समाज पाक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते व पदाधिकाऱ्यांनी त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सन्मान केला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शहरांमध्ये सर्व सुविधा असतात परंतु ग्रामीण भागामध्ये मर्यादा येतात शहरातील पालक वर्ग ही अधिक जागरूक असतो शहरांमध्ये पाल्य व पालकांचा समन्वय मोठ्या प्रमाणात जाणवतो परंतु ग्रामीण भागामध्ये बहुतांश वेळा समन्वयाचा अभाव दिसून येतो.यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी कधीपासून करावी याबाबतची अचूक वेळ साधली जात नाही.
याबाबत तत्परता दाखवली तर ग्रामीण भागात अजही शैक्षणिक टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, ज्या मुलींना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन हवे आहे त्यांना मी मार्गदर्शन करेन.माझा गावाने तालुक्याने यथोचित सन्मान केल्याबद्दल मी सामाजिक सलोखा ठेवून काम करेल.अशी भावना सत्कार सन्माना वेळी नूतन पोलिस उपनिरीक्षक माधुरी हरिचंद्र बिनवडे-खाडे यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी हरिचंद्र बिनवडे, रजनीकांत खाडे, स्वप्निल बिनवडे, समाधान
खांडेकर, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तालुका संयोजक संतोष बिनवडे ,निखील मोरे, वि.अध्यक्ष शंकर सुळ, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, ओबीसी संघर्ष समिती तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, शहराध्यक्ष विलास घोणे,जगन्नाथ सलगर, तालुकाध्यक्ष राज शेटे देशमुख, रावसाहेब बिनवडे, दशरथ मारकड, दिलीप शिंदे, जयराम सांगळे सर आदीसह उपस्थित होते.