करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तहसिल कार्यालय शहराबाहेर हलवण्याच्या भुमिकेला शहरवासियांचा विरोध ; गुपचुप भुमिपुजनाचा सर्वस्तरातुन निषेध

करमाळा – विशाल घोलप

करमाळा तहसील परिसरात मोठ्या प्रमाणावर जागा दिसत असली तरी त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तहसील व संबंधित कार्यालय हे करमाळा शहरात बाहेर मौलाली माळ गुळसडी रस्त्याला जाणार हे निश्चित झाले आहे. याचा भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसह ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी असलेल्या सर्व कार्यालयांना मुकावे लागणार आहे.

मध्यंतरी या विरोधात बातम्या लागल्यानंतर नागरिकांचा रोष दिसून आला होता. तर सर्वपक्षीय कार्यकर्ते मैदानात उतरून त्या विरोधात आंदोलन करणारे होते. पण नंतर सदरच्या चर्चा थंडावल्या व आंदोलन ही स्थगित झाली. पण प्रशासनाचे गुपचूप पणे काम सुरूच होते. या संदर्भात मोठा खुलासा न करता प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करतच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आज अचानक संबंधित ठिकाणी भूमिपूजन केले जाणार असल्याचे दिसून येत आहे.

politics

अगोदरच करमाळा शहराची बाजारपेठ संपत चालली आहे.त्यात प्रशासकीय कामाच्या हेतूने शहरात येणाऱ्यामुळे थोड फार शहराच अस्तित्व टिकून आहे त्यात जर प्रशासकीय इमारती गावाच्या बाहेर गेल्या तर करमाळा शहरातच उरल सुरल महत्त्व आणि बाजारपेठ पण संपून जाईल……सगळं काही सुरळीत सुरू असताना हा निर्णय कशासाठी घेतला हेच समजत नाही….या कामाला जाहीर विरोध.
जितेश कटारिया, करमाळा.

संपूर्ण जिल्ह्यात केवळ करमाळा शहरात सर्व कार्यालय एकाच परिसरात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होतो. याशिवाय शहरात मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असल्याने त्याचा फायदाही नागरिकांना होतो. शहराबाहेर कार्यालय गेल्यानंतर गोरगरिबांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने यावर पुनर्विचार करावा. विशेष म्हणजे शहरातील एवढ्या मोठ्या भागातून मोठे कार्यालय बाहेर जात असताना एकही पुढारी बोलताना दिसून येत नाही. स्वतःच्या प्रश्नांसाठी कांगावा करणारे जनतेच्या प्रश्नांसाठी कधी बोलणार असा प्रश्न आहे.
भीमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले.

जाहीर निषेध…
करमाळा तहसिल कार्यालयाचे स्थलांतर होत आहे. शहराभोवतीच्या राखीव जंगलावर शासनच आता अतिक्रमण करतय. खरतर करमाळा शहरात सर्व प्रशासकीय कार्यालये कृषी विभाग वगळता एकाच ठिकाणी आहेत. हे जेष्ठ नागरिकापासून ते विद्यार्थी सामान्य नागरीक यांना सोईचे आहे.
सध्याचे कार्यालय आहे त्या ठिकाणी प्रशस्त रस्त्याबरोबरच न्यायालय कंपाऊड पासून पुणे रोडपर्यंत मोठ्या प्रमाणात शासकीय भूखंड उपलब्ध असताना आज महत्वाचे कार्यालय दोन किलोमिटर अंतरावर गावाबाहेर जाणार आहे… तसे याची हालचाल चालू असल्याचे वृत ही प्रसिद्ध झाले होते. अपवाद वगळता मिडीयाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
प्रमोद फंड, करमाळा.

कोणत्याही प्रसिद्धी पत्रामध्ये वर्तमानपत्र व इतर माध्यम यामध्ये कुठेही सदर कार्यालयाच्या बाबतीमध्ये वृत्त प्रसिद्ध न करता गोपनीय पद्धतीने सुरू असलेले प्रस्तावित नवीन तहसील कार्यालय गावाबाहेर स्थलांतरित करणे हे संशयास्पद वाटत आहे.करमाळा शहराची अर्थव्यवस्था कोलमडत असताना देखील याचा हेतू परस्पर तीळ मात्र विचार न करता कार्यालय गावापासून बाहेर नेण्याचा घाट का घातला जात आहे असा करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील व स्थानीक सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. करमाळा तालुक्यातील स्थानिक नागरिकांना याची नक्कीच जाणीव असेल. यासाठी मोठ्या प्रमाणावर ती सर्वपक्षीय लढा उभारणे गरजेचे आहे.
अमरजीत साळुंखे, करमाळा.

#KumarVishwas
#collector #solapur
#ShilpaThokade #तहसीलदार #करमाळा #Tahsil_Office #karmala #Sakal #News #Newspaper #Lokmat #PunyaNagari #samana #DivyaMarathi #Pudhari #Sanchar Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Devendra Fadnavis Vijaysinh Mohite Patil Ranjitsinh Mohite Patil Dhairyasheel Mohite Patil BJP Maharashtra Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenamaharashtra

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE