करमाळासोलापूर जिल्हा

कमलाभवानी शुगरचे दहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट – विक्रमसिंह शिंदे

करमाळा समाचार – संजय साखरे


साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून जात असली तरी कारखान्याला येणाऱ्या समस्यांचा यशस्वीपणे मुकाबला करीत कमला भवानी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात दहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे असे प्रतिपादन कमलाभवानी शुगरचे संस्थापक चेअरमन विक्रम सिंह शिंदे यांनी केले.

आज सकाळी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सातव्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ कुर्डवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील जामगावकर व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कारखान्याने यंदा ऊस तोडणीचे तगडे नियोजन केले असून करमाळा तालुक्याबरोबरच शेजारील भूम, परांडा ,कर्जत ,जामखेड व आष्टी या भागातील चांगल्या जातीचा ऊस गाळपासाठी आणला जाणार आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीचा व चांगला साखर उतारा असणाऱ्या उसाच्या जातीची लागवड करावी जेणेकरून सदर उसाला चांगली रिकवरी बसून शेतकऱ्यांना जास्तीचा दर देता येईल. यावर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ३१ मार्चपर्यंत चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कामगारांना १७०० ते २५०० रुपये या दरम्यान पगारवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली .या घोषणेचे कामगारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
यावेळी कारखान्याचे डायरेक्टर जनरल हरिदास डांगे, लव्हे चे सरपंच विलास दादा पाटील, पोथरेचे शहाजी जिंजाडे, बोरगाव चे माजी सरपंच विनय ननवरे, विनोद पाटील, आसपाक जमादार यांच्यासह परांडा ,कर्जत भूम या भागातील ऊस पुरवठादार शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी समाधान भोगे व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायरेक्टर जनरल हरिदास डांगे यांनी केले. तर आभार जनरल मॅनेजर(केन) बी.पी रोकडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साखरे यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE