लाठीचार्ज व मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा ; मराठेतर सदस्याचा पहिला राजिनामा
करमाळा समाचार
आंतरवाली सराटा ता.अंबड जि. जालना या ठिकाणी मराठा समाज बांधवांना झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रोशेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य यशपाल गौतम कांबळे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. विशेष म्हणजे सदर पदाचा तीन पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी बाकी आहे. यशपाल कांबळे हे आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मराठा इतर समाजाच्या नेत्याने सदर भुमिका घेतल्याने समाजात सरकार बद्दल असलेला राग बाहेर पडु लागला आहे.

याबाबत आपला राजीनामा यशपाल कांबळे यांनी आज तहसीलदार व ग्रामसेवक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण व आंतरवली येथे झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख करण्यात आला आहे त्या ठिकाणी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. धुरांच्या नळकांड्या टाकल्या, गोळीबार केला. यामध्ये वृद्ध महिलांना, लहान मुलांना तीव्र स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.

आतापर्यंत त्या ठिकाणी कित्येक नेते येऊन गेले कित्येक मोर्चे निघाले पण यातून कोणताही मार्ग निघालेला दिसून येत नाही. जरांगे पाटील आजही उपोषण करीत आहेत. त्यांची शारीरिक परिस्थिती खराब होत चालली आहे. तरी प्रशासन हे पावले उचलताना दिसत नाही. यामुळे निषेध म्हणून यशपाल कांबळे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.