निवृत्त शिक्षकाच्या मुलीने यूपीएससी परिक्षेत मारली बाजी ; वंजारवाडीची कन्या तर शेलगावची सुन
करमाळा समाचार
वंजारवाडीचे निवृत्त शिक्षक सुदर्शन महादेव केकान यांची मुलगी शुभांगी केकान हीने केंद्रीय लोकसेवा आयोगाची नुकताच निकाल हाती आला त्यावेळी तीची निवड झाल्याचे समजले यानंतर वंजारवाडीसह तालुक्यातुन शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे. सध्या ती शेलगाव (वांगी)ची सुन आहे. तर ते सध्या अहमदनगर येथे स्थायीक आहेत. शिरार ता. आष्टी व संगमनेर यांचे बीडीएस म्हणुन वैद्यकीय शिक्षण झाले आहे.

डॉक्टर शुभांगी यांचे बीडीएस झाल्यानंतर लग्न झाले. त्या लग्न होऊन शेलगाव वांगी येथील सून झाल्या. त्यांचे पती हे बँकेत मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यामुळे त्यांच्यासोबतच त्या अहमदनगर भागात स्थायिक झाल्या. त्या ठिकाणी स्वतः अभ्यास करून त्यांनी पुढील शिक्षण घेतले व सदरची परीक्षा पास झाल्या आहेत. देशात त्यांचा 530 वा क्रमांक आला असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
