करमाळासोलापूर जिल्हा

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर अपघात ; आजोबासह नातीचा मृत्यु

करमाळा समाचार


अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर झरे फाट्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर भीषण अपघातात आजोबा व नात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरचा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास झरे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेल समोर झाला आहे. रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने लुना गाडी धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

हरिभाऊ गायकवाड व त्यांची नात संजीवनी हे लुना गाडी वर जात असताना डीवाईडर जवळून वळण घेताना पाठीमागून वेगात आलेल्या गाडीने त्यांना जोराची धडक दिली त्यावेळी उपचारांना देण्यापूर्वीच दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता अशी प्राथमीक माहीती मिळत आहेत. संबंधित अपघाताची माहिती करमाळा पोलिसात नोंदवण्याचे काम सुरु आहे. सदरच्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE