करमाळासोलापूर जिल्हा

मॉर्निंग क्रिकेट क्लब टेंभुर्णी ठरला कैं श्रीमंत बॉबी राजेभोसले चषक 2022 चा मानकरी

जिंती – दिलीप दंगाणे


कैं श्रीमंत बाँबीराजे भोसले चषक स्पधेचा शुभारंभ दिनांक 08/04/2022 रोजी शुभारंभ करण्यात आला होता. कुमारी सईताई राजेभोसले व कुमार शौर्यजीतराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे नियोजन अँड नितीन राजे भोसले उर्फ दादासाहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.

या सामन्यांमधील प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये व ट्रॉफी मॉर्निंग क्रिकेट क्लब टेंभुर्णी यांनी पटकावली. तर द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये व ट्रॉफी इक्बाल इलेव्हन क्रिकेट क्लब टाकळी श्रीगोंदा या संघाने पटकावले. तृतीय पारितोषिक 21000 श्रीमंत मकाई क्रिकेट क्लब जिंती या संघाने पटकावले. चतुर्थ पारितोषिक अकरा हजार रुपये माळेगाव संघाने पटकावले.

या चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज इक्बाल इलेव्हन संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून शैलीत चौबे खेळाडूला रेंजर सायकल देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच या स्पर्धे मध्ये पंच म्हणून गजानन पोटे, सनी धेंडे, तानाजी चव्हाण, फय्याज तांबोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी पाहिली. तर आयोजक म्हणून रवी उर्फ पप्पू धेंडे, औदुंबर दिंडकर, शुभम शिंदे यांनी काम पाहिले.

politics

तसेच समालोचन भाऊसाहेब थोरात रुई बारामती व त्यांचे सहकारी म्हणून अभिमान्य( अबा )शिंदे यांनी माहिती प्रसारित केली व स्कोरर म्हणून सुधाकर गायकवाड यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील राजकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील तसेच काही श्रीमंत बॉबी राजे भोसले यांचे जुने सहकारी मित्र बहुसंख्येने उपस्थित होते व पश्चिम भागातील क्रिकेटप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा आनंद लुटला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group