बारामती ॲग्रो शेटफळगडे कारखान्याचा मुळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी – दिलीप दंगाणे
सन 2021 22 च्या गळीत हंगामातील बारामती ॲग्रो कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम बारामती ॲग्रो चे चेअरमन आदरणीय राजेंद्र दादा पवार तसेच कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार आदरणीय रोहित दादा पवार तसेच बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाष गुळवे यांच्या शुभहस्ते सकाळी दहा वाजता संपन्न झाला.

पुढे बोलताना आदरणीय आमदार रोहित दादा पवार म्हणाले की, बारामती ऍग्रो कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला भाव दिला आहे. तसेच इथून पुढे ही आम्ही चांगला भाव देणार आहोत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देण्यास घाई गडबड करू नये प्रोग्राम प्रमाणे सर्व सभासदांचे उसाचे गाळप करणार आहोत.

यावेळी उपस्थित मुख्य शेतकी अधिकारी बनगर साहेब, तसेच फॅक्टरी मॅनेजर जठार साहेब, शेतकी अधिकारी चाकणे साहेब, हरिभाऊ गुळवे साहेब अन्य कर्मचारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.