करमाळा बंदची अफवा ; सर्व व्यवहार सुरळीत चालु राहणार
करमाळा समाचार
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. तरी कुठेही बंद पाळला जाणार नाही. त्यामुळे बाकी व्यवहार सर्व सुरळीत चालू राहतील अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. काही लोकांकडून बंद असल्याबाबत अफवा पसरवली गेली असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सहा दिवस पूर्ण होत आले तरी सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांची प्रकृती खालावली असली तरी अद्यापही त्यांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तर गावोगावी नेत्यांना प्रवेश बंद करून निषेध व्यक्त केला जात आहे. तर करमाळा शहरात मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये गावातील व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. अद्याप कसलीही बंदची घोषणा करण्यात आलेली नाही अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
