करमाळासोलापूर जिल्हा

दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा केविलवाणा प्रयत्न ; ग्रामपंचायत पराभवानंतर सुचलेले शहानपण

करमाळा समाचार 

काम सुरुच तरीही उद्घाटनाची घाई

तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे व तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कार्यकाळात 5 मार्च 2019 रोजी उमरड, सावडी व अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून त्यासाठी प्रत्येकी 65 लाख याप्रमाणे 1 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्याचा प्रशासकीय मंजुरी आदेश माझ्याकडे आहे असा दावा वामनराव बदे यांनी केला आहे. तर उमरड येथे आता सत्ता हातातुन गेल्याने सरपंच निवडीपुर्वी उद्घाटन करण्याचे शहानपण सुचले आहे.

विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दोन दिवसापूर्वी उमरड येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले असून आपणच हे सर्व केले आहे असा आव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. ते त्यांनी तात्काळ थांबवावे व दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन श्री वामनदादा बदे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की उमरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी आदेश मार्च 2019 मध्ये निघाला. ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून संजयमामा शिंदे यांनी कामकाज पाहिले आहे. विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्ष म्हणून निवड 31 डिसेंबर 2019 रोजी झालेली आहे .या सर्व घटनाक्रमकडे पाहिले असता असे लक्षात येते की अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष होण्याच्या दहा महिने अगोदरच उमरड येथील आरोग्य केंद्राचे काम मंजूर होऊन त्यासाठी प्रत्यक्ष 65 लाखांची तरतूदही करण्यात आलेली होती.

यावरून विद्यमान अध्यक्ष यांचा खोटारडेपणा स्पष्टपणे दिसून येत आहे . उमरड येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम अद्याप अपूर्ण असतानाही, नळ फिटिंग, लाईट फिटिंग , फरशी बसवणे , ब्लॉक बसवणे इत्यादी कामे अपूर्ण असतानाही अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी उद्घाटनाचा देखावा कशासाठी केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE