करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नगर डेपोच्या बसवर करमाळ्यात दगडफेक ; मराठा समाजाच्या युवकांना आवाहन

करमाळा समाचार

सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा शहरात सध्या साखळी उपोषण सुरू आहे तर काही वेळापूर्वी panDharpur पंढरपूर -अहमदनगर ahamadamagr(नगर ) डेपो ची गाडी करमाळा (karmala) बस स्टॅन्ड प्रवेश गेटच्या 100 मीटर पाठीमागे अज्ञातांनी दगड मारून काचा फोडलेले आहेत. यामुळे मराठा समाज आक्रमक होतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आंदोलन होतील. आदेशाशिवाय कुठेही तोडफोड करू नये असे आवाहन सकल मराठा समाजात करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील पाच दिवसांपासून करमाळा येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनात साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या भागातून सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिले जात आहे. तर काही अज्ञातांकडून बसच्या जाहिरातीमध्ये असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्याला काळे फासले होते. तर करमाळा तहसील परिसरातही असलेल्या डिजिटल फलकावर फोटोंवर काळे फासल्याने मराठा समाजातील युवक आक्रमक होताना दिसत आहेत.

करमाळा बाहेरील तालुक्यांमध्ये व इतर जिल्ह्यात सध्या जाळपोळ व तोडफोडीला सुरुवात झाले आहे. अशातच आज करमाळा येथे बसवर झालेल्या दगडफेकीमुळे करमाळ्यातही आंदोलन आक्रमक होताना दिसत आहेत. आज दुपारी तीन-चार सुमारास अहमदनगर पंढरपूर या नगर डेपोच्या बसवर दगडफेक झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE