ग्रामीण भागातील विद्यार्थीनी निशा शरद वाडेकरचा सन्मान
करमाळा समाचार
उत्तर वडगाव येथील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी निशा शरद वाडेकर हिने दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे बारावी सायन्स मध्ये 81.17 गुण मिळवल्या बद्दल तसेच MHT-CET ( PCB) ग्रुप ला 96.40 persantile मार्क मिळवल्या बद्दल तसेच सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवल्या बद्दल कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विवेकानंदाजी वखारे साहेब तसेच दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय संजयजी नगरकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निशा शरद वाडेकर हिचे 1ली ते 7 वी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण जि प प्रा शाळा उत्तर वडगाव व उच्च शिक्षण प्रगती विद्यालय मांगी येथे झाले. तिने 1 ली ते 10 वी पर्यंत चे शिक्षण मराठी माध्यमातून घेऊन सुद्दा सायन्स व CET मध्ये उत्तम यश मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
