सा.ना. जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं१ नगर परिषद करमाळा या शाळेत करमाळा वसुंधरा महोत्सवात विद्यार्थ्यांचा आनंद उत्सव
करमाळा समाचार
आज शुक्रवार दिनांक 31/12/ 2021 रोजी माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुखयाधिकारी आदरणीय श्री.बालाजी लोंढे साहेब यांच्या आदेशानुसार करमाळा वसुंधरा महोत्सवाचा दुसरा दिवस बार्शी/करमाळा शिक्षण मंडळाचे कर्तव्यदक्ष प्रशासन अधिकारी आदरणीय श्री.अनिल बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन व त्याच बरोबर प्लास्टिक मुक्त जनजागृती करत प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून स्वतः बनवलेल्या कापडी पिशव्या मान्यवरांना व पालकांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला.या प्रदर्शनाचे उद्घाटन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय गणेशभाऊ करे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः कल्पकतेने वेगवेगळ्या वस्तू बनवून स्वनिर्मितीचा आनंद घेतला.

प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल फंड, शिक्षण तज्ञ सदस्य डॉक्टर महेश वीर, व्यापारी जितेश कटारिया, पालकांमधून बाळू कसबे रमेश गरड सर,जाधव सर व इतर 250 पालकांनी प्रदर्शनास भेटी दिल्या. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू पाहून सर्व मान्यवर पालक यांनी विद्यार्थ्यांचे,खूप कौतुक अभिनंदन केले. मुखाधिकरी व प्रशासन अधिकारी यांच्या प्रेरणेतून विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यामुळे करमाळा शहरात आनंदमय शैक्षणिक वातरण निर्माण झाले आहे.
शाळेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कल्पकता जिज्ञासा वाढीस लावण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दयानंद चौधरी सर,शिक्षक रमेश नामदे सर, निलेश धर्माधिकारी सर सुवर्णा वेळापूरे मॅडम,चंद्रकला टांगडे मॅडम, सुनिता शिरसागर मॅडम, मोनिका चौधरी मॅडम, तृप्ती बेडकुते मॅडम, भाग्यश्री पिसे मॅडम, संध्या शिंदे मॅडम या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.