वाळू माफिया पुन्हा एकदा सक्रिय; करमाळ्यासह पुणे जिल्ह्यातील जनतेचा सहभाग
करमाळा समाचार
निवडणुकीचा बिगुल वाजताच वाळूमाफिया पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची दिसून येत आहे. प्रशासन कामकाजात अडकलेले असताना वाळूमाफियाने डोके वर काढले असून उजनी पट्ट्यातून वाळू उपसा केला जात आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यासह भिगवन व परिसरातील वाळूमाफियाचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.

मागील बऱ्याच काळापासून छुपा पद्धतीने वाळू उपसा होत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्यापासून संबंधित वाळू माफिया यांनी डोके वर काढले आहे. खातगाव व परिसरात वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

या ठिकाणाहून वाळू उपसा करणाऱ्या बोटीचा फोटोही ग्रामस्थ काढत आहेत. या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीने यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही पत्र प्रशासनाला लिहिले आहे. यावरून आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.