करमाळ्याच्या तहसिलदार ठोकडेंचा वाळु माफियाला दणका ; ८० ब्रास वाळु जप्त
करमाळा समाचार
कंदर तालुका करमाळा येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी तब्बल 80 ब्रास वाळू मिळून आली आहे. त्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

सदरच्या ठिकाणी यापूर्वी वाळू उपसा केला जात होता त्यावेळी माहिती मिळाली तेव्हा प्रांत व तहसिलदार यांनी छापा टाकला त्यावेळी बोटी जिलेटीन च्या माध्यमातून फोडण्याच्या सुचना दिल्या होत्या पण सदरची बोट उडवली नसल्याचे लक्षात आले आहे. त्यावरही तहसीलदार कारवाई करू शकतात.

मागील बऱ्याच काळापासून तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी वाळु माफिया विरोधात आघाडी घेत संपूर्ण बाजूने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारी येताच त्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणातील संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे.