करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आपल्या तालुक्यात सध्या काय सुरु आहे – समाधानी आहात का, अडचणीत उलट भर पडलीय ?

करमाळा समाचार – आज काल न्युज पोर्टल वाढले आहेत. कोण कोणाच्या फायद्यासाठी कोणती भुमिका घेईल ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यातुन काहीचा स्वार्थ भागत आहे. ते चुकीचे लोक अशा बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यत स्वतःची प्रतिमा उजळवतात पण खरच आलेल्या बातमीत तत्थ आहे का हे तपासणे गरजेचे झाले आहे.

मागील सहा महिन्यांपासून करमाळा शहराला पाणी नाही. उजनी जलाशय मायनस 36 टक्के पर्यंत गेलेल्या असताना (आज प्लस मध्ये आहे) व तालुक्यात पाऊस नसताना ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू नाहीत. दोन ते तीन महिन्यापासून तालुक्यात प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रमुख अधिकारी नसल्यामुळे महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रमुख नेते हे सत्ताधारी गटात असतानाही तालुक्यात केवळ मोठे प्रोजेक्ट मंजूर व मार्गी लागल्याचे दाखवल्यात जात असताना पाणी, रस्ते व आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित होत आहेत.

वेगवेगळ्या माध्यमातून तालुक्यात सध्या फसवणुकीचे प्रकार ही वाढले आहेत. यामध्ये बनावट बोगस डॉक्टर असतील किंवा ट्रीपच्या नावाखाली यात्रा घोटाळा असेल, लग्नाची आमीश दाखवून मुलांची फसवणूक केली जात आहे, तर व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून युवकांसह वृद्धांनाही गंडवले जात आहे, एटीएम मधून परस्पर पैसे काढले जात आहेत, तर दुसऱ्याचे गाडीचे क्रमांक शहर ठिकाणी वापरून फसवणूक केली जात आहे, आजकाल तर मुलेही मुलींना लग्नाच्या आमिश दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळू लागले आहेत.

या सर्व गोष्टींसाठी कोणाकडे जायचे , कोणाकडे आपली कैफियत मांडायची, कोण आपले समस्या सोडवणार ? हा मूलभूत प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. पण जरी याबाबतीत तक्रारी करायचे ठरवले तर प्रमुख अधिकारीच नाहीत. मग कोणाकडे तक्रारी करायच्या असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. काही कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या जमिनी तिसऱ्यांच्या नावावर केल्या कोर्टात हेलपाटे घालायला शेतकऱ्याला मोकळे सोडले. त्याचे निकाल वर्षानुवर्ष लागत नाहीत अशा परिस्थितीत या बेभरवशाच्या अधिकाऱ्यांच्या जीवावर कारभार चालू राहणार का?

आज सोशल मीडियामुळे सर्वत्र लोक हुशार झाले आहेत असे आपण म्हणत असलो तरी याच काळात आता फसवणुकीचे प्रकार ही वाढले आहे. त्यामुळे खरंच आपला तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे जातोय का मागे जातोय हे पाहणे गरजेचे आहे. आज पर्यंत तालुक्यात बरेचसे नेते आले व गेले परंतु विकासाच्या नावाखाली केवळ मोठे आश्वासन मिळाली. तालुक्याला गरजेचे असलेल्या बाबी आजही मिळत नसल्याने युवकांच्या हाताला काम नाही. बरेचसे मंडळी पुणे मुंबईच्या दिशेने गेलेली असताना आपण केवळ सोशल माध्यमातून विकासाच्या गप्पा मारतो.

आपल्यासमोर होत असलेल्या चुकीच्या कामांबद्दल आपण कधी प्रश्न विचारणार हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. जेव्हा कधी आपले काही चुकीचे होईल त्यावेळेसच आपल्याला जाणीव होते की हे चुकीचे सुरू आहे. पण जोपर्यंत दुसऱ्याच्याही अडचणीत आपण लक्ष घालत नाही तोपर्यंत आपण सुरक्षीत राहू शकणार नाही. ती वेळ आपल्यावरही भाविकाळात येणार आहे. त्यामुळे एखादीची अडचण होत असेल तर त्याला सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केल्यास पुढचे सावज आपण होऊ होणार नाही हे नक्की. त्यामुळे आज आपल्याकडे पाणी नसेल, विकासकामे होत नसतील, चुकीची काम होत असतील तर आवाज उठवा संबंधित यंत्रणाला जागे करा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE