धक्कादायक बातमी – कुंकु गल्ली येथील संजय पांढरे यांचे निधन ; अकलुज येथे घेतला अखेरचा श्वास
करमाळा समाचार
करमाळा येथील कुंकुगल्ली येथील रहिवासी संजय कांतीलाल पांढरे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर अकलुज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज मध्यरात्री त्यांनी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे.

करमाळा तालुक्यात बागल कुटुंबीयांचे निकटवर्तीय होते. ते स्व. दिगंबरराव बागल यांच्या नंतरही चालक म्हणुन काम पाहत होते. नुकतेच त्यांनी स्वतःची गाडी घेऊन व्यवसाय सुरु केला होता. करमाळा येथील कुंकुगल्ली येथे वास्तव्यास होते. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना माननारा वर्ग मोठा होता.

ते आजारी होते. बुधवारी त्रास वाढल्याने त्यांना अकलुज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असताना शुक्रवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. करमाळ्यात कुंकुगल्ली येथे राहत्या घरापासुन त्यांची अत्ययात्र निघणार आहे. त्यांच्या अचानक जाण्याची माहीती मिळताच त्यांच्या निकटवर्तीयासह करमाळावासीयांना मोठा धक्का बसला आहे.