आमदार लंकेंच्या पाऊलावर पाऊल ठेवत करमाळ्या कोविड रुग्णांसाठी संतोष वारेंचा पुढाकार ; राष्ट्रवादी उभारणार १०० बेड चे सेंटर
करमाळा समाचार
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यानंतर आता करमाळा तालुक्यात ही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी कोरोना रुग्णांसाठी पुढाकार घेतला आहे. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने आनंदी लॉन्स मंगल कार्यालय पोथरे येथे शंभर कोविड बेडचे सेंटर उभारण्याचा उद्या उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी आमदार निलेश लंके हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात वेगळे आमदार म्हणून एक वेगळा ठसा निर्माण केलेले. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी आपुलकी व आपली लोक म्हणून एक हजार बेडचे गोविंड सेंटर उभे केले आहे. त्याचेच अनुकरण इतर तालुक्यातील नेत्यांनी करावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.

आमदार-खासदार तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य यांनी पुढाकार घेऊन असे काही केले नसले तरी माजी आमदार शामल बागल यांचे सुपुत्र दिग्विजय बागल, कंदर चे भास्कर भांगे, रावगांवमधील कोवीड केअर सेंटर ला ग्रामस्थ व कालिंदा फाऊंडेशन, वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव, नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समिती रावगांव चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत व सर्व विश्वस्त मंडळ यांचे कडून एकुण ५०बेड देण्यात आले आहेत, वीट, वांगीचे गावकरी यांनी एकत्र येत तसेच तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी केअर सेंटर उभा राहिले आहे. त्यात आता संतोष वाऱे यांच्या वतीने पुढाकार घेऊन पोथरे येथे शंभर बेडचे कोविड केअर उद्घाटन उद्या होत आहे. त्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी निलेशजी लंके आमदार यांच्या शुभहस्ते तर उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, गटविकास अधिकारी श्रिकांत खरात, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तालुका आरोग्य अधिकारी सागर गायकवाड, बारामती ॲग्रो चे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे व यश कल्यानी सेवा भावी संस्था अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 7 मे रोजी सकाळी दहा वाजता पोथरे येथे पार पडणार आहे.