बाहेरुन आलेल्यांसह स्थानिक पोलिसांचे जेवणावाचुन हाल !! ; संबंधित यंत्रणेच्या कामावर प्रश्न चिन्ह
करमाळा समाचार

करमाळा येथे नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुका निकाल सुरळीत पाडण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होताना या ठिकाणी दिसले. विशेषतः पोलीस प्रशासनाचे जवळपास 500 कर्मचारी त्या ठिकाणी असताना मोजक्याच लोकांच्या जेवणाचा प्रश्न सुटला. तर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसले. यामुळे थोड्या वेळापुरता त्या ठिकाणी वाद ही निर्माण झाला होता. परंतु ज्या पोलीस प्रशासनाच्या भरोशावर सर्व यंत्रणा पार पडली त्याच यंत्रणेला असे उपाशी ठेवणं कितपत योग्य हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणाच्या निवडणुकांचे निकाल करमाळा येथील तहसील कार्यालय परिसरात पार पडले. या ठिकाणी करमाळा शहरासह बाहेरून होमगार्ड, पोलीस फोर्स असे एकूण 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते. व्यवस्थित सर्व यंत्रणा काम करत असताना दुपारी जेवणाची वेळ होऊन गेली. त्यावेळी सुरुवातीला मतमोजणी कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी जेवणाला सुरुवात केली.
त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना जेवण योग्य पद्धतीने व वेळेत देणे अपेक्षित असताना त्यांना जेवणासाठी बोलवलेच गेले नाही. त्यामुळे स्थानिक असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला व लवकर जेवण पुरवठा करण्याच्या सूचनात केल्या. परंतु जेवण अपुरे असल्याने केवळ भात शिल्लक असल्याचा दिसून आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या आपापल्या पद्धतीने स्वतःची सोय करून घेतली. त्यानंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र बराचसा उशीर झाला होता.

अखेर उर्वरित कर्मचारी जे बाहेरून सोय करू शकले नाहीत त्यांची सोय तिथेच करण्यात आली. परंतु त्यातही जिथे मिळेल अशा ठिकाणी बसून त्यांनी हे जेवण केलेले दिसून आले. त्यांना सावलीत जेवण देणे अपेक्षित असताना तसे टेबल खुर्ची न देता मिळेल त्या जागेत सदरचे कर्मचारी बसून भोजनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून आले परंतु त्यांच्याकडे नाराजी चा सूर दिसून आला विशेष म्हणजे त्यातील एकही कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाकडे कसलीही तक्रार केलेली नाही पण हा सर्व प्रकार पत्रकारांसह इतरांसमोर सुरू असल्याचे दिसून आले. ज्या पद्धतीने संबंधित यंत्रणेची पोलीस प्रशासनाच्या भोजनाची व्यवस्था करणे जबाबदारी आहे. तशीच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनीही त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते अशी चर्चा सुरू होती.

